Latest News

6/recent/ticker-posts

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शिवाजीराव( दादासाहेब ) पाटील निलंगेकरांनी मराठवाड्याच्या,राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. संवेदनशील आणि सामान्य जनतेसाठी कायम तत्परतेने मदत करणारे नेते म्हणून ते ओळखले जात. त्यांचे सेवा कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. असे मत सुरेन्द्र निळकंठराव धुमाळ आपले मनोगत व्यक्त बोलले.

निटूर: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शिवाजीराव (दादासाहेब) पाटील निलंगेकर व्दितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आज महाराष्ट्र विद्यालयात निटूर येथे करण्यात आले. याप्रसंगी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन दिनकर नाना निटुरे, नंदकुमार हासबे. ग्रा. प सदस्य निटूर, निवृत्ती शिंदे, दिलीप हुलसुरे- माजी पंचायत समितीसभापती निलंगा, काँग्रेसचे नेते जब्बार चाऊस, लक्ष्मण मगर, डांगे वाडीचे सरपंच- श्रीकांत जन्मले, शरदचंद्र सूर्यवंशी, इस्माईल गस्ते, शेंद येथील तुकाराम सावंत,

"मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राचे संपादक- के वाय पटवेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी अमृता जगदाळे, भोयबार सिद्धी, वाघमारे क्रांती हिने आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन एस एन भोयबर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी मानले.


Post a Comment

0 Comments