Latest News

6/recent/ticker-posts

पुरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची केली गावकऱ्यांनी सुटका

पुरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची केली गावकऱ्यांनी सुटका


बी डी उबाळे

औसा: औसा तालुक्यातील भेटा-कोंड-जायफळ या परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4:00 ते 5:00 वाजलेच्या  दरम्यान पाऊस पडला असल्याने कामाला गेलेले शेतकरी आणि शाळेचे विद्यार्थी पुलावरून पाणी जात असल्यामुळे जिकडे तिकडे अडकले होते.


भेटा ते आंदोरा रस्त्यावर पुलाचे काम अनेक दिवसापासून मागणी करूनही पूर्ण होत नसल्याने या परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भर पावसात शाळेचे विद्यार्थी व परिसरातील शेतकरी अडकले होते. शेवटी पुरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची केली गावकऱ्यांनी सुटका. भेटा ते आंदोरा रस्त्यावरील पुलाची उंची वाढवून मजबूत पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे परंतु या कामी संबंधिताचे दुर्लक्ष होत असल्याने भेटा आंदोरा या गावच्या शेतकरी ग्रामस्थ व विद्यार्थी पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments