Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यातील खरीप पिकांना गोगलगाय, वन्य प्राण्यांचा उपद्रव;उत्पादन घटनेची शेतकऱ्यांना भीती

औसा तालुक्यातील खरीप पिकांना गोगलगाय, वन्य प्राण्यांचा उपद्रव;उत्पादन घटनेची शेतकऱ्यांना भीती


 बी डी उबाळे

औसा: यावर्षी खरीप पिकाची पेरणी उशिरा मान्सूनचे आगमन झालेने झाली आणि नंतर सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे वाढ खुंटली आहे. तसेच गोगलगायी, मोर,रानडुक्कर आणि हरीण अशा वन्य प्राण्यांचा उपद्रव खरीप पिकाला सुरुवातीपासूनच असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन यावर्षी कमालीचे घटनार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 औसा तालुक्यामध्ये सुमारे 80 हजार हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली असून उर्वरित क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी उडीद मूग तूर अशा खरीप पिकाची पेरणी केली असली तरी पेरणी पासूनच गोगलगायी व हरणांचा उपद्रव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. तसेच सततचा पाऊस लागल्यामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागती करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या पिकामध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना खुरपणी कोळपणी करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. नैसर्गिक संकट शेतकऱ्याच्या मुळावर आले असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. अधून मधून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकामध्ये आंतरमशागती करणे कठीण होऊन बसले आहे. औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून गेल्या वर्षी सोयाबीनवर करपा हा एक बुरशीजन्य रोगांमुळे सोयाबीनच्या तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकाचा धुरळा उडाला होता आणि यावर्षी प्रथमच गोगलगायसारख्या नाही रुपद्रवी वाटणाऱ्या प्राणी आणि औसा तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील पिकाची पूर्णपणे नासाडी केल्याचा अनुभव यावर्षी शेतकऱ्यांना आला आहे.यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या पिकांमध्ये पाणी गेले असून महसूल विभाग आणि कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकाची त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विविध संघटना व राजकीय पक्ष करीत असताना शासन मात्र अद्याप या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना शासनामार्फत तातडीची आर्थिक मदत नाही मिळाल्यास येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या रोशाला राजकीय नेत्यांना सामोरे जावे लागणार असल्याची ही चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments