Latest News

6/recent/ticker-posts

संवेदनशील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. अवयवदान केलेल्या स्व. सिंधुताई तळवार यांच्या कुटुंबियांचे मानले आभार

संवेदनशील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. अवयवदान केलेल्या स्व. सिंधुताई तळवार यांच्या कुटुंबियांचे मानले आभार


लातूर: जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी. यांनी आज अवयवदान केलेल्या स्व. सिंधुताई तळवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या सर्वांचे आभार मानून आस्थेवाईकपणे संपूर्ण परिवाराची माहिती घेतली. लातूर शहरातील सिंधुताई तळवार यांचे ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांचे अवयवदान करण्याचा क्रांतिकारी निर्णय मुलगा शिवराज, विनोद, जावई विजय कोळी(जि प शिक्षक) त्यांचे सहकारी शिक्षक विजय माळाळे, गिलडा सर यांनी घेतला आणि ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या मदतीने आणि सोलापूर प्रशासनाच्या सहकार्याने 26 जुलै रोजी सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. 27 जुलै रोजी लातूरमध्ये सिंधुताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांनी तळवार कुटूंबातील प्रत्येक सदस्याची माहिती घेतली. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत कुठे अडचण आली याचीही इत्यंभूत विचारपूस केली. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण अवयावदानाची ही सर्वश्रेष्ठ प्रक्रिया लातूरात करू शकलो नाही याबद्दलची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments