Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहरात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती जल्लोषात साजरी

लातूर शहरात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती जल्लोषात साजरी


विविध राजकीय पक्षांसह समाज बांधवांनी अभिवादनासाठी केली मोठी गर्दी

लातूर: संयुक्त महाराष्ट्र चवळवळीचे क्रांतीवीर लोकशाहीर, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती लातूर शहरात विविध उपक्रम व कार्यकमांनी लेझिम व ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. आज १ ऑगस्ट रोजी सकाळी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माजी मंत्री आ. अमित देशमुख व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मिथून गायकवाड, सुनील बसपूरे, सचिन क्षीरसागर, महेश क्षिरसागर, अशोक देडे, कैलास कांबळे यांच्यासह पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मातंग समाज बांधवांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौकात जयंती सोहळ्या ठिकाणी दोन पँडॉलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिवाय कुस्त्यांचा जंगी फडाचे उद्धाटन करण्यात आले. दिवसभर कुस्त्यांचा फड रंगला होता. तसेच शहरातील चौकाचौकात पँडॉल उभे करून कार्यकर्त्यांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. शहरातील आण्णाभाऊ साठे चौकातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.  जय लहूजी व जय आण्णाभाऊ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. मातंग समाज बांधव व आण्णाभाऊ  प्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी साहित्यसम्राट आण्णाभाऊसाठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments