अॅड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधीर विद्यालयास रोटी मेकर भेट
लातूर: जीवन विकास प्रतिष्ठान द्वारा संचलित अॅड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधीर विद्यालयास पुणे येथील सी.ओ. लक्ष्मीनारायण राजेंद्रप्रसाद अग्रवाल यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना दैनंदिन भोजणासाठी चार लाख रुपये किंमतीची रोटी मेकर मशीन विद्यालयास भेट दिली आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात लक्ष्मीनारायण अग्रवाल यांनी फित कापून या रोटी मेकर मशीनचे उद्घाटन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव नरेंद्र अग्रवाल, संचालक अभय शहा, संजय निलेगावकर, तसेच मुख्याध्यापक जी. एल. जोगदंड व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यालयाच्या वसतिगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जेवताना नियमित गरम चपाती मिळावी या उददेशाने पुणे येथील सी.ओ. लक्ष्मीनारायण अग्रवाल यांनी हे रोटी मेकर विद्यालयास भेट दिले आहे. यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोय झाली आहे. दिलेल्या या रोटी मेकर बददल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


0 Comments