Latest News

6/recent/ticker-posts

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात


 
अहमदपूर: तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संस्थाध्यक्ष जीवन कुमार मध्ये वाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या रितू मद्देवाड, उपप्राचार्या जेबा नादर, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, यांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी नाटक, सामूहिक नृत्य, भाषणे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून उपस्थितांची मने जिंकली. पर्यावरण संरक्षणाची शपथ ही यावेळी घेण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दिनांक 12 ऑगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थ्यांची अहमदपूर शहरामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी तिरंगा रॅली काढण्यात आली. निबंध स्पर्धा, भाषण, रंगभरण, वाद विवाद स्पर्धा, गीत गायन अशा वेगवेगळ्या स्पर्धांची प्रमाणपत्रे वितरणही करण्यात आले. संस्थाध्यक्षांनी भाषणातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम कुमार व रितू सिंग तर आभार संगमेश्वर ढगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यासाठी शाळेतील शिक्षकांनी, कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments