Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या पत्नी व वीर पत्नीचा तहसीलदार मार्फत सत्कार

चाकूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या पत्नी व वीर पत्नीचा तहसीलदार मार्फत सत्कार


चाकूर: तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे आयोजन 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चाकूर तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व वीर पत्नीचा तहसीलदार मार्फत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हा सत्कार चाकुर तहसिलदार यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये वडवळ(ना.) येथील ज्येष्ठ स्वातत्र्यसैनिक स्वर्गीय तुकाराम सगर यांच्या पत्नी श्रीमती सावित्रीबाई तुकाराम सगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे छोटे चिरंजीव बळवंत सगर सह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments