Latest News

6/recent/ticker-posts

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे दहीहंडी उत्साहात साजरी

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे दहीहंडी उत्साहात साजरी

देवणी:(प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. शिवाजीराव सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक नरहरी शास्त्री, माजी केंद्रप्रमुख लक्ष्मणराव दारणुळें तसेच सौ. लक्ष्मीबाई साबणे आणि सौ. माया नरवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


यावेळी आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाचे प्रदर्शन केले. त्यात गीत गायन ,नृत्यकला आणि राधाकृष्ण वेशभूषा करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.


 या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर आणि संस्थेचे सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य कु. सुप्रिया कांबळे यांच्या नियोजनाप्रमाणे विक्रम गायकवाड सांस्कृतिक विभाग प्रमुख आंबेनगरे, पतंगे ताई आणि तसेच डॉ. सोनटक्के, रणजीत गायकवाड व स्वाती मॅडम तसेच उत्तम नियोजक भोजने शिक्षक/ शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केले. तसेच या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments