पारंपारिक शेतीला दिला फाटा शेतकऱ्याचां रेशीम विकासात वाटा
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील शेती व्यवसाय हा सतत घाट्यात येत असून शेती व्यवसायातून फायदा मिळावा यासाठी पारंपारिक शेतीला फाटा देऊन काही शेतकऱ्यांनी रेशीम लागवड केली आहे. या रेशीम लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्याचे चित्र औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये दिसून येत आहे. कारण गेल्या दोन ते तीन वर्षापासून भादा येथील मोजक्याच शेतकऱ्यांनी या पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती म्हणून आणि कमी दिवसाचे सुरक्षित असे नगदी पीक म्हणून या रेशीम लागवडीकडे मोर्चा वळविला असून या रेशीम लागवडी मधून चांगले उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
2018 यावर्षी भादा येथील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला सोडून आधुनिक आणि नगदी पीक म्हणून रेशीम लागवड करावी याकरिता तत्कालीन रेशीम कार्यालयाचे कर्मचारी यांनी भादा तालुका औसा या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी मार्गदर्शन केले या मार्गदर्शनातून औसा तालुक्यातील भादा गावातील 80 शेतकरी तयार झाले परंतु त्या रेशीम कार्यालयाच्या नियमानुसार या गावातील केवळ 30 शेतकरी त्या प्लॉट लागवड क्षेत्रामध्ये निवडण्यात आले. इतर शेतकऱ्यांनी संबंधित क्षेत्र मर्यादा पूर्ण न केल्याने इतर शेतकरी त्या लाभापासून वगळण्यात आले. त्यानंतर यातील शेतकऱ्यांपैकी दहा शेतकरी या रेशीम लागवडीतील जे रोपे तयार केली जातात ती रोपे याची मर्यादा पूर्ण करण्यात दहा शेतकऱ्यांना अपयश आले.
यामुळे भा दा येथील शेतकरी हे एकूण 20 राहिले. या शेतकऱ्यांनी रेशीम लागवडीपासून उत्पन्न मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले.यातून काही शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतले आणि त्याचा आर्थिक लाभही त्यांना झाला परंतु काही शेतकऱ्यांनी केवळ शासकीय लाभ घ्यावा या उद्देशाने लागवड केली आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत त्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रेशीम लागवडीपासून उत्पन्न घेण्याचे विसरले. यामुळे त्यांचे ते एक एकर क्षेत्र वाया गेले तर गेल्या तीन ते चार वर्षांपासून चार शेतकरी वर्षातून तीन ते चार वेळेस रेशीम लागवडीपासून 50 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये दर तीन महिन्याला उत्पन्न घेत असल्याचे शेतकऱ्याकडून समजते. तर सध्या हे रेशीम लागवडीपासून उत्पन्न घेणारे भा दा येथे केवळ चार शेतकरी शिल्लक राहिले आहेत. यामध्ये वैजिनाथ विनायक पाटील,राजेंद्र नारायण गिरी,बिलास नंदू नारायण जाधव आणि लायक शब्बीर पठाण या चार शेतकऱ्यांनी सध्या ही उत्पन्न घेणे सुरूच ठेवले आहे.



0 Comments