औसा पंचायत समिती इमारत तिरंगा रंगाच्या लाईटने नटली
बी डी उबाळे
औसा: औसा पंचायत समिती ची भव्य इमारत ही स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष 75 निमित्त या इमारतीवर तिरंगा रंगाची लाइटिंग करण्यात आली असून ही भव्य इमारत या लाइटिंग मुळे सुंदर आणि दिव्य अशी दिसत आहे.
यामुळे शासन निर्णय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपली कार्यालय स्वच्छ सुंदर आणि आकर्षक दिसली पाहिजेत आणि हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात देशभरामध्ये साजरा झाला पाहिजे असा आदेश असल्याने सर्व शासकीय कर्मचारी आपली वैयक्तिक आणि खाजगी सर्व कामे सोडून शासनाच्या निर्देशानुसार आपले कार्यालय सुंदर कार्यालय याप्रमाणे कार्यालयाची सजावट आणि हर घर झेंडा घर घर झेंडा याबाबत सर्व स्तरातून नियोजन केले जात आहे. अशाच पद्धतीने औसा पंचायत समितीची इमारत लाईटीगणे सजावट केल्याने ही इमारत पाहण्यासाठी शहरातील आणि खेड्यातील नागरिक या इमारतीच्या समोर येत गर्दी करीत असल्याचे चित्र या पंचायत समिती औसा कार्यालयासमोर दिसून येत आहे.

0 Comments