Latest News

6/recent/ticker-posts

हजरत ढोलाशहावली कादरी दर्गा धानोरा शरीफ यांचा संदल उत्साहात

हजरत ढोलाशहावली कादरी दर्गा धानोरा शरीफ यांचा संदल उत्साहात

निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील मौजे धानोरा गावातील हजरत ढोलाशहा कादरी दर्गा धानोरा शरीफ यांचा संदल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धानोरा गावातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हजरत ढोलाशहा कादरी दर्गा धानोरा शरीफ़ ओळखले जाते गावातील प्रत्येकाची श्रद्धा असलेले श्रद्धास्थान आहे. सज्जादे नसिन सय्यद नूरल्ला कादरी यांचा मुलगा सज्जादे नसीन सय्यद अयान कादरी यांचे हस्ते संदल चढवण्यात आले. 


संदल चढवल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सय्यद हाजीअली कादरी, रशिद शेख, मुक्तार अहेमद, पाशासाहेब शेख बाबूमिया पठाण, सरदार शेख, इम्रान शेख,अलीम शेख, हुसेन पठाण, आयुब पठाण, इस्माईल काळे, सलाउद्दिन मोमीन, समीर मोमीन,जावेद शेख, फेरोज पठाण, अफसर शेख, इरफान शेख व गावातील नागरिक महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments