धानोरा तंटामुक्ती अध्यक्षपदी फुलचंद जाधव तर उपाध्यक्षपदी कुलदीप जाधव यांची बिनविरोध निवड
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील मौजे धानोरा गावात दि.29 आगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत नवीन तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. धानोरा तंटामुक्ती अध्यक्षपदी फुलचंद नामदेव जाधव व उपाध्यक्षपदी कुलदीप भास्कर जाधव व ग्रामसुरक्षा दलप्रमुख सूर्यकांत सुभाष सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष फुलचंद जाधव व उपाध्यक्ष कुलदीप जाधव व ग्रामसुरक्षा दलप्रमुख सूर्यकांत सूर्यवंशी यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार मानले.
यानिवडीबद्दल सुरेश जाधव, नरसिंग पेटकर, रशिद शेख, निकेतन जाधव, शशिकांत जाधव, यशवंत जाधव, उत्तम जाधव, बालाजी सूर्यवंशी, गणेश सावकार, गोरख काळे, गजानन जाधव, नरसिंग बारतोंडे, अजित पाटील, सतीश पाटील, हंसराज आवले, बाळू सावकार, बब्रुवान जाधव, दिगंबर काळे, पंढरी बारतोंडे, ज्ञानबा श्रीरसागर, ओमकार नाईकवाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

0 Comments