महाराष्ट्र विद्यालय, निलंगा या शाळेचे NMMS परीक्षेत यश
निलंगा: 19 जून 2022 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेने दरवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोना संकट असतानाही महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत यश मिळवून अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. सदर परीक्षेत कु. तगरखेडे वर्षाराणी, कु. सातपुते अनुष्का,कु.भुरे श्रावणी,माने ऋत्विक या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थ्यांपैकी कु. तगरखेडे वर्षाराणी या विद्यार्थीनीस इयत्ता नववी ते बारावी प्रतीवर्ष बारा हजार रुपये (अठ्ठेचाळीस हजार रुपये), तर कु.सातपुते अनुष्का, कु. भुरे श्रावणी व माने ऋत्विक या विद्यार्थांस छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती इयत्ता नववी ते बारावी प्रतीवर्ष नऊ हजार सहाशे रुपये ( अडोतीस हजार चारशे रुपये) शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सदर विद्यार्थ्यांना श्री सोनवणे बी एम यांचे मार्गदर्शन लाभले.
NMMS परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर के, उपमुख्याध्यापक पवार डी डी, पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस.डी. यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.


0 Comments