महाराष्ट्र महाविद्यालयातील ८ विद्यार्थी JEE advance परीक्षेस पात्र
निलंगा: येथील महाराष्ट्र शिक्षण समिती, अंतर्गत संचालित कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सन २०२२ मध्ये झालेल्या JEE परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयात या विद्यार्थ्यांचा व पालकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.
अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर साहेब तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उमेश पवार हे उपस्थित होते. यावेळी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, CET-CELL चे समन्वयक प्रा. श्रीराम पौळकर, CET-CELL चे सहाय्यक समन्वयक प्रा. अनुप पांचाळ, प्रा. सुरज वाकोडे आदि उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी उजळे अभिषेक, काळे अभिजित, नितनवरे संजना, मुळे प्रसाद, राठी प्रणव, आगलावे आशितोष, तांबोळी आयान, पळसे सुधीर विद्यार्थी व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांनी केले.
संस्था अध्यक्ष विजय पाटील निलंगेकरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयाकडून विद्यार्थी व पालकांना पुढील काळामध्ये महाविद्यालय आणखी गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहील असी ग्वाही दिली व उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राकेश दवणे यांनी केले. आभार प्रा. विजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. एम. दिवे, प्रा. धनराज मंडले, प्रा. एस. डी. सातवी, प्रा. एस. सी. पाटील, शिंदे इस्माईल व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments