Latest News

6/recent/ticker-posts

विज्ञानामुळे मानवी जीवनाची उन्नती- सुरेश घोळवे

विज्ञानामुळे मानवी जीवनाची उन्नती- सुरेश घोळवे 


देवणी:(प्रतीनीधी /विक्रम गायकवाड) आबासाहेब इंग्लिश स्कूल,देवणी व पंचायत समिती शिक्षण विभाग,देवणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी देवणीचे तहसीलदार सुरेशजी घोळवे आपल्या भाषणात म्हणाले कि,कार्यकारणभाव म्हणजे प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण असल्याशिवाय ती घटना घडू शकत नाही.तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाच्या अंगी असणे खूप महत्वाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान,भोपणीचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर,उद्घाटक तहसीलदार सुरेश घोळवे व तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य.चंद्रकांत जावळे ,गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड ,शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत येवले ,गट समन्वयक सदाशिव साबणे, केंद्रप्रमुख किशनराव बिरादार पांडुरंग यलमटे, विजयकुमार चौहान, ज्ञानोबा कारले, माधव फावडे, जब्बार मोमीन, प्रा.डॉ. शिवाजीराव सोनटक्के आणि तसेच आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या.सुप्रिया अनिल कांबळे ,उपप्राचार्य सत्यवान सोनटक्के उपस्थीत होते.

               तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकुण 39 प्रयोग सहभागी झाले. विज्ञानाचे विविध माॅडेल /प्रतिमानांचे सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले. सर्व संशोधक विद्यार्थ्यांचा उत्साह याप्रसंगी ओसंडून वाहत होता. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खालील विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी पारितोषिके प्राप्त केली.

देवणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2021-22 निकाल 


उच्च प्राथमिक गट

प्रथम- के.प्रा.शाळा वडमुरंबी- आंबेगावे प्रतिमा प्रशांत

द्वितीय- प्रा.शाळा टाकळी - म्हेत्रे गणेश

तृतीय - प्रा.शाळा आंबेगाव- गादगे देवानंद हणमंत

माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात

प्रथम- महादेव विद्यालय धनेगाव- सावंत श्रीपती मनोज

द्वितीय- आबासाहेब इंग्लिश स्कूल , देवणी-गणेश भालके, महेश माने 

तृतीय- भोगेशवर विद्यालय तळेगाव- लादे महादेव धनाजी 

शिक्षक गटात ( प्राथमिक)

प्रथम- नाईक आर.के- के.प्रा.शिवाजीराव.गौडगाव

द्वितीय- बिरादार पी.डी- प्रा.शा.चवणहिप्परगा

तृतीय- म्हेत्रे एस.आर.

शिक्षक गटात ( माध्यमिक)

प्रथम- येवरे एस.डी- नृसिंह विद्यालय,गुरधाळ

द्वितीय- मनसुरे एस.आर- विवेक व.वि.देवणी

तृतीय- मोरे एम.ए- महात्मा गांधी वि.आंबेगाव.

Post a Comment

0 Comments