Latest News

6/recent/ticker-posts

आधार प्रतिष्ठानकडून भादा कडून जि प प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना सुलेखन नोटबुक भेट

आधार प्रतिष्ठानकडून भादा कडून जि प प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना सुलेखन नोटबुक भेट


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील आधार प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेकडून येथील तीनही जि प प्रशाले मध्ये सुलेखणासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोट बुक भेट देत सर्वांना वाटप करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यात शेती,आरोग्य आणि शिक्षण या तीन क्षेत्रामध्ये आधार प्रतिष्ठान सेवाभावी संस्था काम करीत असून शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी जी प प्रशाला भादा,कन्या शाळा येथील 500आणि आनंदनगर येथील 170 विद्यार्थी 1 ली ते 9 वी चे विद्यार्थी आहेत या ठिकाणी असलेल्या सर्व मुला मुलींना या सुलेखन नोटबुक विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात आद्य शिक्षिका,राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तर पुढे बोलताना मुख्याध्यापक मोहन माकणे म्हणाले की, या विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्याचा पुरेपूर उपयोग करून आम्ही तीन महिन्यांमध्ये या विद्यार्थ्यांचे अक्षर जरूर सुंदर बनवू अशी ग्वाही मुख्याध्यापक मोहण माकणे आणि डॉ नागेश पाटील,शिवलिंग नागपुरे यांनी आधार प्रतिष्ठानकडून दिलेला शिक्षणासाठी हा एक मोलाचा आधार असून त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी करून घ्यावा आणि आपल्या गावचे आणि स्वतःचे भवितव्य उज्वल करावे असा यावेळी मोलाचा सल्ला देण्यात आला.

यावेळी आधार प्रतिष्ठानचे मनोज पाटील,रियाज खोज,बालाजी उबाळे,प्रशांत पाटील,पांडुरंग बनसोडे,उपसरपंच बालाजी शिंदे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील,सुरेश लटूरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इस्माईल मुलांनी,बाळासाहेब जाधव आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका,विद्यार्थी यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवलिंग नागापुरे यांनी व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments