Latest News

6/recent/ticker-posts

रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशनिंग टेक्निशियन वतीने कार्यशाळेला उत्सुर्त प्रतिसाद

रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशनिंग टेक्निशियन वतीने कार्यशाळेला उत्सुर्त प्रतिसाद


रियाज मणियार

लातूर: दि. १६ सप्टेंबरच्या ओझोन दिवसाच्या पूर्वार्ध पुणे येथील मँक्स कुलिंग सिस्टीम आणि लातूर येथील मराठवाडा रेफ्रिजरेशन यांच्या संयोगाने लातूर जिल्ह्यातील क्षेत्रातील टेक्निशियन साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्या शाळेत पर्यावरण ला घातक असलेला R २२ रेफ्रिजरेंट वापर बंद करून पर्यायी गॅस कसा हाताळायचा कशी काम करायची याविषयी टेक्निकल माहिती देण्यात आली. वातावरण दुषित होऊ नये म्हणून इंडस्ट्रीतील कंपन्यांमध्ये वापरले जाणारे रासायनिक घटक यांचे योग्य नियोजन झाल्यास पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते. रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये वापरले जाणारे R-22 सारखे रेफ्रिजरंट हे हवेत सोडल्याने त्याचे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे ओझोन लेअर ला छिद्र पाडून सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर येऊन त्वचा विकार, कँन्सरसारखे आजार व नैसर्गिक जैविक साधनसामग्रीची हानी होत आहे असा निष्कर्ष जागतिक पातळीवर सर्वेक्षणातून समोर आला आहे. अशा जून्या रेफ्रिजरंटना हवेत सोडण्याऐवजी मशिनच्या साहाय्याने रिकव्हरी करून व त्यांचे योग्य पद्धतीने विघटन करणे क्रमप्राप्त आहे  व असे निसर्ग हानी करणारे गँसेस बंद करण्याचा निर्णय सर्व देशांनी घेतल्याने यावर पर्याय म्हणून मार्केटमध्ये विविध प्रकारचे पर्यायी गँसेस उपलब्ध असून त्याची माहिती व ते गँसेस भरताना मशिन मध्ये करावयाचे बदल व काळजी याविषयी मँक्स कुलींग सिस्टीम पुणे यांच्या सहयोगाने GIZ प्रोक्लोमा या शासनमान्य कार्यशाळेचे आयोजन मराठवाडा रेफ्रिजरेशन अँन्ड रेफ्रिजरेशन एअरकंडिशनिंग टेक्निशियन असोशियन लातूर यांच्या तर्फे सोमवार दिनांक १२ सप्टेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत उदयश्री लॉज येथे संपन्न झाले .चार दिवसांच्या या ट्रेनिंग मध्ये 30 जणांची एक बंँच असे सलग दोन बँचमध्ये ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातील टेक्निशियन यांनी याचा लाभ घेतला. या ट्रेनिंग प्रोग्राम साठी मँक्स कुलींग सिस्टीमचे अब्राहम मँथ्यूसर व ट्रेनर म्हणून मुकुंद गुजर, अजितकुमार थंपी, जाँन लुईस व चनाप्पा बिरादार यांनी प्रँक्टिकलसह प्रशिक्षण दिले.

चार दिवसांच्या या कार्यशाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाल्याचे समाधान टेक्निशियन यांनी व्यक्त केले. व GIZ प्रोक्लोमाच्यावतीने टेक्निशियन यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यापुढेही अशा कार्यक्रमांबरोबर टेक्निशियनच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मराठवाडा रेफ्रिजरेशन चे ओवनर सय्यद अथर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्शद खान, अजहर शेख, अनवर बागवान, साहिल तांबोळी रियाज मणियार व सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी केले.

Post a Comment

0 Comments