Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने लसीकरणाचा मुहूर्त अखेर ठरला

शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने लसीकरणाचा मुहूर्त अखेर ठरला


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील पशुपालक शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने स्थानिक स्तरावरील भागामध्ये लसीकरणाचा अखेर मुहूर्त ठरला असे भादा गावामध्ये चर्चा आहे.

भादा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शिवानंद मुक्कंनवार यांच्याशी संपर्क साधला असता सध्या शासनाच्या निर्देशानुसार बोरगाव- नाहोली या भागामध्ये गतवर्षी लसीकरण करण्यात आले नव्हते यामुळे त्या दोन्ही गावात आणि भादा येथील म्हैस वर्ग यांना वगळण्यात आले असून केवळ गाय वर्ग या पशुंनाच लसीकरण करण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले आणि काळमाथा येथे एक पशु लंपी स्कीनचा आढळल्याने त्याच्यावर जिल्ह्यावरून टीम येऊन योग्य उपचार करण्यात आले आहेत त्यामुळे ते पशु सध्या चांगल्या पद्धतीने योग्य औषध दिल्याने उपचारास प्रतिसाद देत असल्याचे त्यावर उपचार करणाऱ्या टीमने सांगितल्याचे ते म्हणाले तसेच दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी भादा गावातील लसीकरण पूर्ण करण्यासाठी उदगीर येथील पशु वैद्यकीय दवाखान्यातील टीम येऊन लसीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औसा तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पशूंना  रोगांची साथ आल्याने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली गेली पाहिजे म्हणून भादा येथील अनेक शेतकरी पशुवैद्यकीय दवाखाना भादा श्रेणी 1 येथे जाऊन त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांना लसीकरण मोहीम राबविली जावी यासाठी  विनंती करीत होते. परंतु सध्या भादा गाव वगळता आजूबाजूच्या खेडोपाडी लसीकरण सुरू होते.


यामुळे भादा गावातील लसीकरण लांबणीवर पडले होते परंतु मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी गरजू शेतकरी आणि पशुपालक यांनी भादा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्कणवर यांच्याशी संपर्क साधून भादा गावांमध्ये लसीकरण करण्यात यावे अशी विनंती केली या विनंतीवरून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मुक्कन्नवार यांनी लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून सध्या 600 पशुसाठी लसीकरण डोस उपलब्ध झाला असल्याची माहिती भादा येथील शेतकरी संजय सोनाजी बनसोडे यांनी सदरील प्रतिनिधीशी दिली.

Post a Comment

0 Comments