Latest News

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य नागरसोगा ग्रामपंचायतने सुरु केली घंटागाडी

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य नागरसोगा ग्रामपंचायतने सुरु केली घंटागाडी


बी डी उबाळे

औसा -17 सप्टेबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मराठवाड्यात आनंदोत्सव साजरा केला जातो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्ताने शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालये येथे ध्वजारोहण हि केले जाते,


नागरसोगा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.सरोजा भास्कर सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर गावातील सभागृहाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व गावचे सुपुञ स्व.देविसिंह चौहाण गुरुजी यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. 

गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन घंटा गाड्या सुरु केल्या असून त्याचा शुभारंभ हि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

        यावेळी सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर, ग्रामविकास अधिकारी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी, महेश साळुंके, अशोक अड्सुळे, बाळू कोळी, पूजा जवादे, सुकुमार फावडे, चेअरमन यशवंत शिंदे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सतीश फावडे, सदस्य काशिनाथ सूर्यवंशी, छोटू मिया शेख, चंद्रकांत जवादे, तानाजी फावडे, रमेश आडसुळे, संतोष बेडगे, दीपक चाबुकस्वार ,यशवंतराव सूर्यवंशी, गुडप्पा जवादे, मधुकर सूर्यवंशी, शिवाजी फावडे, वसंत जाधव, दिलीप सूर्यवंशी, बाबू शिंदे,  धनंजय सूर्यवंशी, रमेश शिंदे, बाळू कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments