Latest News

6/recent/ticker-posts

साथ रोगांना प्रतिबंध करण्यासाठी भादा गावामध्ये ग्राम पंचायत कडून कलोरोफाईडची फवारणी

साथ रोगांना प्रतिबंध करण्यासाठी भादा गावामध्ये ग्राम पंचायत कडून कलोरोफाईडची फवारणी 


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा गावांमध्ये सध्या हाय क्लोरोफाईडची फवारणी संपूर्ण गावांमध्ये करण्यात येत आहे.


यामुळे सध्या वातावरणातील बदलामुळे आणि दूषित अशा नैसर्गिक बदलाने होत असलेले अनेक विविध आजार मानव आणि प्राण्यांना यापासून लागण होत आहे ही लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय शासन स्तरावरून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भा दा तालुका औसा या गावांमध्ये शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 20 22 रोजी सकाळी संपूर्ण गावामध्ये फवारणी करण्यात आली. संपूर्ण गल्ली बोल या हाय क्लोरोफाईड निर्जंतुकीकरण औषधाने फवारणी करण्यात येत आहे.


यामुळे मानव आणि प्राण्यासाठी ही फवारणी एक चांगल्या पद्धतीची आणि आरोग्यवर्धक ठरेल अशी शक्यता नागरिक व्यक्त करीत असून या फवारणी करिता प्राथमिक आरोग्य केंद्र भादा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय भादा कडून ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि उपसरपंच बालाजी एम शिंदे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्या नियोजनातून हीच फवारणी संपूर्ण गावांमध्ये करण्यात येत असून या फवारणीचा उपयोग नक्कीच गावातील साथ रोग प्रतिबंध होण्यास नक्कीच सफलता मिळेल अशी अपेक्षा भादा गावातील दक्ष नागरिक व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments