Latest News

6/recent/ticker-posts

बिहार पॅटर्नच्या फळझाड वृक्ष लागवडीने भादा गाव बहरणार

बिहार पॅटर्नच्या फळझाड वृक्ष लागवडीने भादा गाव बहरणार


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा गावामध्ये बिहार पॅटर्न वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने भादा गाव फळाने बहरणार अशी चर्चा सध्या भादा गावांमध्ये दिसून येत आहे.


शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी आनंदनगर भागामध्ये 1 हजार नारळ या झाडाची लागवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच बालाजी एम शिंदे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, कृषी सहाय्यक सुरेखा गव्हाणे, तलाठी राम दूधभाते आणि सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. औसा तालुक्यातील भादा गाव हे मोठ्या लोक वस्तीचे असल्याने आणि गाव हे विविध ठिकाणी वसलेले असल्याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध झाली आहे. याचाच फायदा घेत भादा ग्रामपंचायत इकडून फळ झाडांची लागवड गावातील विविध रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सर्व ठिकाणी करण्यात आली असून गावामध्ये वृक्ष लागवडीसाठी ज्या घरापुढे जागा उपलब्ध आहे अशा घरासमोरही हे फळझाड वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. या फळझाड लागवडीसाठी शासनाची मदत घेऊन हा उपक्रम औसा तालुक्यात नव्हे तर लातूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे राबविल्याचे मॉडेल भादा गाव या वृक्ष लागवड करण्यासाठी तयार होईल अशी चर्चा प्रशासकीय स्तरावर असल्याचे समजते. तर आतापर्यंत एकूण फळझाडांची संख्या जवळपास सात हजार लागवड करण्यात आली असून यामध्ये नारळ आणि आंबा हे दोन फळझाड मोठ्या प्रमाणात लागवड केले असल्याची माहिती येथील उपसरपंच बालाजी एम शिंदे आणि ग्रामविकास अधिकारी माणिक व्हि सूर्यवंशी यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

0 Comments