यशवंत विद्यालय लातूरच्या एन.सी.सी कॅडेट्सची ऑल इंडिया ट्रॅकिंग कॅम्पसाठी निवड
यशवंत विद्यालय लातूरच्या एन.सी.सी कॅडेट्सची तिरुपती आंध्रप्रदेश येथे ऑल इंडिया ट्रॅकिंग कॅम्पसाठी निवड झालेल्या एन.सी.सी कॅडेट्सचे अभिनंदन करताना शालेय समिती अध्यक्ष आनंदराव माने, मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, पर्यवेक्षक दयानंद कांबळे, एन.सी.सी ऑफीसर महावीर काळे.
लातूर: दि. 15 ‘ऑल इंडिया ट्रॅकिंग एक्सपिडीशन 2022’ हा कॅम्प दि.18 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 या दरम्यान होणार आहे सदरील कॅम्प जगप्रसिध्द देवस्थान तिरुपती आंध्रप्रदेश येथे आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये यशवंत विद्यालय लातूर येथील रुपेश ठाकूर, सुमित भालेराव, महेबुब पटवेकर, हिमांशु लोखंडे, कृष्णा काडवदे, आदित्य बेंद्रे असे एकूण 6 एन.सी.सी कॅडेट व या कॅम्पचे नेतृत्व करणारे यशवंत विद्यालयातील एन.सी.सी ऑफीसर महावीर काळे सहभागी होत आहेत.
भारतातील आंध्रप्रदेश, केरळ-लक्षद्विप, महाराष्ट्, आरिसा, तामिळनाडू, पॉन्डेचरी या राज्यातील 510 एन.सी.सी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. 53 महाराष्ट् बटालियन एन.सी.सी. लातूरचे 30 एन.सी.सी कॅडेट्स व नांदेडचे 30 एन.सी.सी कॅडेट्स व मुंबई येथील 42 असे एकूण महाराष्ट्रातून 102 एन.सी.सी कॅडेट्स सहभागी होत आहेत. या कॅम्पचा मुख्य उद्देश एन.सी.सी कॅडेट्समध्ये वैज्ञानिक जाणिव जागृती व साहस निर्माण करुन पर्यावरणाविषयी प्रायोगिक (स्वअनुभव) आत्मसात करणे हा आहे. कॅम्पदरम्यान सर्व एन.सी.सी कॅडेट्स जगप्रसिध्द देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान येथे भेट देऊन त्या परिसरातील श्री व्यंकटेश्वरा प्राणी संग्रहालय, वैद्यकिय आयुर्वेदिक उद्यान आदी स्थानांना भेटी देणार आहेत. दररोज हे कॅडेट्स 12 ते 19 कि.मी अंतर पार करणार आहेत. सदरील कॅम्पमध्ये सहभागी एन.सी.सी कॅडेट्सना 53 महाराष्ट् बटालियन एन.सी.सी. लातूरचे कमांडींग ऑफीसर ले.कर्नल संतोष कुमार, सुभेदार मेजर दिपक कुमार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, सचिव प्रा. अनिरुध्द जाधव, शालेय समिती अध्यक्ष आनंदराव माने, मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, उप.मु.अ.शिवाजी जाधव, पर्यवेक्षक दयानंद कांबळे व सर्व शिक्षक यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.



0 Comments