Latest News

6/recent/ticker-posts

बऱ्याच विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला.

बऱ्याच विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला.


शेख बी जी.

औसा: दि.2 औसा तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसाने वाळत चाललेल्या पिकाला जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधी नंतर संतत धार सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. ज्यांनी पेरणी केली होती अशा शेतकऱ्यांची पिके अधिक पाण्यानं वाहून गेली होती. तर काही पिकांना गोगलगायने खाल्ले होते. सतत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मागचा ससेमीरा काही संपता संपत नव्हता. ज्या शेतकऱ्यांची पिके काही अंशी आली होती ती पिके पाऊस नसल्याने माना टाकत होते. 25 दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर काल रात्री दिनांक 1 सप्टेंबर रोजी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments