भादेकर स्नुषा प्रा.सुजाता घोडके यांना पी एच डी प्राप्त
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्यातील भादा येथील रहिवाशी प्रा. सुजाता व्यंकट घोडके, सहयोगी प्राध्यापिका, एम आय टी स्कूल ऑफ फूड टेकनालॉजी एम आय टी आर्ट, डिझाईन अँड टेकनालॉजी युनि्हर्सिटी पुणे यांनी "स्टडीज ऑन कर्कुमिन फोर्टीफाईड फनकशनल बीवरेज फॉर हेल्थ क्लेम" या विषयावर संशोधन करून पीचडी पदवी प्राप्त केली. सदरील संशोधन त्यांनी डॉ वसंत पवार, प्रोफेसर एमेरित्स एम आय टी स्कूल ऑफ फूड टेकनालॉजी एम आय टी आर्ट, डिझाईन अँड टेकनालॉजी युनि्हर्सिटी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्याबद्दल त्यांचे आणि या कामासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणारे त्यांचे पती प्रा व्यंकट घोडके यांचे औसा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

0 Comments