Latest News

6/recent/ticker-posts

अमृतसर येथे राष्ट्रीय स्तरावर थायबॉक्सिंग या स्पर्धेत लातूरचे खेळाडू चमकले

अमृतसर येथे राष्ट्रीय स्तरावर थायबॉक्सिंग या स्पर्धेत लातूरचे खेळाडू चमकले


लातूर: गुरुनानक युनिव्हर्सिटी, अमृतसर पंजाब येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत एकूण १६ राज्यांनी सहभाग घेतला एकूण साडेचारशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अनुक्रमे सांघिक चषक महाराष्ट्र प्रथम तर ओडिसा द्वितीय व दिल्ली तृतीय असे सांघिक चषक पटकावले या स्पर्धेचे आयोजन पंजाब स्टेटने केले होते. या स्पर्धेत श्री शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, लातूर मधून १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंची निवड दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. या मध्ये श्री शांतिनिकेतन स्कूल मधील सर्व विद्यार्थ्याची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे, अस्मिता सोमवंशी (सुवर्ण पद ), जान्हवी गोलकोंडे ( सुवर्ण पद ), संजना एच यू ( सुवर्ण पद ), कृष्णा तिडके ( सुवर्ण पद), विवेक कांबळे (सुवर्ण पद ), प्रज्वल बेंबळगे (सुवर्ण पद ), नीरजा पाटील ( रोप पद ), अझलान सिद्दीकी (रौप पद), बालाजी भांगे ( रौप पद), सोहन मराले (रौप पद), प्रणव चव्हाण (रौप पद), व्यंकटेश शिंदे (रौप पद) रईद शेख (रौप पद), साद सय्यद (रौप पद), तन्मय कुडके (रौप पद), विपुल नामदास (कांस्य पद) शिवेंद्र सूर्यवंशी (कांस्य पद), सोहम गुडे (कांस्य पद) अथर्व नादरगे (कांस्य पद). यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापिका रेणुका मोलगी तसेच जनार्धना रेड्डी, सरफराज शेख, सोहेल खान, शिक्षक वृंद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक फरहान नबीजी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments