Latest News

6/recent/ticker-posts

गणेशोत्सवानिमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे विविध उपक्रम

गणेशोत्सवानिमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे विविध उपक्रम


देवणी:(प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) दि. 3 सप्टेंबर 2022 रोजी आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे विविध उपक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यात 5वी ते 10वी या वर्गासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेचा विषय म्हणून "गुरूंचे महत्त्व "हे ठेवण्यात आले यावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे विचार निबंध लेखनात मांडले. तसेच 1 ली ते 4 थी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. वरील उपक्रमांचे गौरीनंदन गणपती यांची सर्वप्रथम आरती घेऊन आयोजन करण्यात आले. या विविध कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर, संस्थेचे सचिव गजानन जी भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य. सुप्रिया अनिल कांबळे यांच्या नियोजनानुसार विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यात उपप्राचार्य. सत्यवान सोनटक्के, उमेश आंबेनगरे, रणजीत गायकवाड, विक्रम गायकवाड, इमरान पठाण, भीमराव महाके, मोहसीन शेख,  विश्वनाथ बिरादार, वैष्णवी बिरादार, प्रियंका मंटोळे,स्वाती कोयले, रेणुका पतंगे, इफरोज शेख, सुवर्णा सोनटक्के, नेहा शेख, पूजा ढगे, योगेश्वरी काकनाळे, सबा सय्यद, सरिता बिरादार, प्रतीक्षा सूर्यवंशी, रेखा आडे यांच्या मदतीने हे उपक्रम सुंदर व शिस्तीत पार  पडले. तसेच विजयकुमार भोजणे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमांमध्ये कै. रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव सोनटक्के व महाविद्यालयाचे संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच या विविध उपक्रमांचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अशा पद्धतीने गणेशोत्सवानिमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे विविध उपक्रम व कार्यक्रम घेऊन व महाप्रसादाचे आयोजन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments