Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव चे शहीद जवान अब्बास मुजावर यांच्या कुटुंबाचे महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सन्मान

केळगाव चे शहीद जवान अब्बास मुजावर यांच्या कुटुंबाचे महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सन्मान


निलंगा: शहीदो को शत शत नमन या केंद्र सरकारच्या उपक्रमा अंतर्गत आज निलंगा तालुक्यातील केळगाव येथील 1996 जम्मू काश्मीर येथील लढाईतील शहीद जवान लांस नायक अब्बास हुसेनसाब मुजावर यांच्या कुटुंबीयांचा केळगाव येथे भारत सरकारच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र 53 बटालियन येथून सुभेदार दिलीप दामोजी, हवालदार हरी गायकर, एनसीसी निलंगा अधिकारी मेजर सी जे कदम यांच्या उपस्थितीमध्ये शहीद पत्नी रुकसाना मुजावर यांचा सन्मानचिन्ह देऊन केंद्र सरकारच्या वतीने सन्मानित करून शहिदांना आठवण करण्यात आली.


प्रथमता शहीद जवान अब्बास हुसेन मुजावर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना वाहण्यात आली व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शहीदो को शत शत नमन म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी शहीद पत्नी रुकसाना अब्बास मुजावर, मुलगा वाजिद अब्बास मूजावर, शहीदांचे पुतने पत्रकार जावेद मुजावर, गावचे सरपंच प्रतिनिधी सुभाष कांबळे, उपसरपंच सुधाकर चव्हाण, देवराव चव्हाण, एकनाथ चव्हाण एनसीसी निलंगाचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments