शहीद जवान चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी चंद्रकला जाधव यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान
शेख बी जी
औसा: दिनांक 12 रोजी शहीद जवान नायक चंद्रकांत जाधव यांच्या घरी जाऊन भारत सरकारच्या आदेशानुसार व 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्या आदेशानुसार शहीद जवानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहिदांना अभिवादन केले व तसेच शहिदांची पत्नी श्रीमती चंद्रकला चंद्रकांत जाधव यांचा भारत सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी 53 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष कुमार, सुभेदार मेजर दीपक कुमार, सुभेदार दिलीप कुमार , हवालदार हरी गायकर, लेफ्टनंट आर जी महावरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम एम बेटकर , तसेच माजी एनसीसी ऑफिसर आर व्ही कारंजे, तसेच अजीम हायस्कूलचे सिद्दिकी.जे.के तसेच संपूर्ण जाधव परिवार व एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
यावेळी शहिदांच्या पत्नी चंद्रकला जाधव यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम एम बेटकर यांनीही महाविद्यालयाच्या वतीने व एनसीसी विभागाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली काही अडचणी असतील तर त्याही जाणून घेतल्या व भविष्यकाळात काही अडचणी आल्या तर त्या सोडवल्या जातील असे याप्रसंगी त्यांना सांगण्यात आले.


0 Comments