Latest News

6/recent/ticker-posts

JEE Advance परीक्षेत महाराष्ट्र महाविद्यालयाचे घवघवीत यश

JEE Advance परीक्षेत महाराष्ट्र महाविद्यालयाचे घवघवीत यश


निलंगा: महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी JEE Advance 2022 परीक्षेत उत्कृष्ठ यश सपांदन केले. NTA व्दारे घेण्यात आलेल्या JEE Advance परीक्षेसाठी एकुण 9 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यात कु. संजना अनिल नितनवरे ही विद्यार्थीनी ऑल इंडिया रँक 2076 क्रमांक पटकावुन आयआयटीसाठी पात्र ठरली.  पालकाची अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिने अत्यंत मेहनतीने हे यश संपादन केले. तसेच चि. प्रणव लक्ष्मीकांत राठी या विद्यार्थ्याने B-ARCH.JEE paper II मध्ये ऑल इंडिया रँक 45 प्राप्त करुन NIT या नामवंत संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरला. ग्रामीण भागातील अभ्यासू व होतकरु विद्यार्थी महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातुन शिक्षण घेवून देशपातळीवरील  परीक्षेत यश सपांदन करत आहेत. सध्याच्या काळात शिक्षणासाठी विद्यार्थी व पालकांचा शहाराकडे कल वाढलेला आहे. अशा परिस्थितीतही NIT व IIT या राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शिक्षणसंस्थात ग्रामीण भागातील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होत आहेत ही बाब निलंगा तालुक्यासाठी खरोखरच भुषणावह आहे.


या यशाबददल महाराष्ट् शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर व संस्थेचे समन्वयक दिलीप धुमाळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या वेळी महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड तसेच या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मोलाची भुमिका बजावणारे CET CELL समन्वयक तथा गणित विषय शिक्षक श्रीराम पौळकर सहाय्यक समन्वयक तथा रसायनशास्त्र शिक्षक अनुप पांचाळ JEE समन्वयक तथा भौतीकशास्त्र शिक्षक राकेश दवणें व NEET समन्वयक तथा भौतीकशास्त्र शिक्षक विजय देशमुख उपस्थित होते.


या यशाबददल महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्त्र कमर्चारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments