भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत माझं लातूर परिवाराची "संविधान उद्देशिका"....
नवी मुंबई: माझं लातूर परिवाराने हाती घेतलेला दिशादर्शक संविधान उद्देशिका उपक्रम नवी मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत पोहोचला.
माझं लातूर परिवाराच्या वतीने काल राज्याची राजधानी असलेल्या मुंबई येथील सीबीडी बेलापूर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स एज्युकेशन्स स्कूल येथे स्कूलचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक आर.डी.पाटील यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आली. यावेळी माझं लातूर परिवाराचे सदस्य "मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राचे संपादक के.वाय.पटवेकर, लेखक दीपक निरंजन, मनोज राजपक्षे, नितीन शिंदे, चिमुकले- अजिज रशीद पटवेकर, सिमरन रशीद पटवेकर, तृणाली मनोज राजपक्षे यांची उपस्थिती होती.
मुख्याध्यापक पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून संविधान उद्देशिका भेट दिल्याबद्दल माझं लातूर परिवाराचे आभार मानले आहेत.


0 Comments