Latest News

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी विवेक जाधव यांची निवड

संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी विवेक जाधव यांची निवड


शिरूर अनंतपाळ: ता. २५ - शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील विवेक बालाजी जाधव यांची मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

रविवारी (ता. २५) रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा (पश्चिम) कार्यकारिणीची बैठक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक उमाकांत उफाडे, विभागीय कार्याध्यक्ष वैजनाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष रामहरी भिसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिरूर अनंतपाळ तालुका शाखेची कार्यकारणी गठीत करुन सर्वानुमते तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी उजेड येथील विवेक जाधव यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ग्रंथभेट देवून सुपुर्द करण्यात आली. बैठकीस लातूर महानगर अध्यक्ष मिथुन दिवे, निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, मंथन जाधव, ईर्शाद शेख यांच्यासह लातूर, औसा, निलंगा, रेणापूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल जाधव, उपाध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील, शिवराज एकुर्गे, हुसेकर, भालचंद्र पाटील, शिवसेनेचे भागवत वंगे, युवासेनेचे किशोर मोहिते, कृष्णा पवार, आकाश मोहिते, शशिकांत जाधव, ज्योतिरादित्य जाधव यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments