Latest News

6/recent/ticker-posts

देवणी(खु) येथे अक्का फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बुध्दवासी साधुराम भद्राजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

देवणी(खु) येथे अक्का फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बुध्दवासी साधुराम भद्राजी कांबळे यांच्या द्वितीय  पुण्यस्मरणा निमित्त मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) 'दृष्टी अभियान' ग्रामीण भागातील नेत्र आरोग्याची चळवळ बनलेल्या ‘दृष्टी अभियान’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादामूळे 'दृष्टी अभियान  ०२ ची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुरु करण्यात आले असून देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर २०२२ सुरु राहणार आहेत. 'दृष्टी अभियान ४.० शिबिर देवणी तालुक्यातील देवणी(खु) येथे पार पडले.

याप्रसंगी १६८ नागरिकांच्या नेत्र तपासणीत  ३४ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे. यातील  रुग्णांना तात्काळ शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच इतर मोतीबिंदूगस्त रुग्णांची काळजी फाऊंडेशन घेत आहे. याशिबिरात ९५ गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी अक्का फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे, भाजयुमो माजी तालूकाध्यक्ष प्रंशात पाटील सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, अनिल कांबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, मनोहर पाटील संचालक, प्रशांत गायकवाड कार्यक्रम समन्वयक, सचिन निलंकर नेत्रतंत्रज्ञ, सौरभ गुडमेवार, चष्मा विभाग, मुख्याध्यापक कांबळे कांतराव, शिवाजी कारभारी, बूथ प्रमूख संजय गरड, बाबुराव उगिले, सिताराम पाटील, उमाकांत बर्गे, माधव पाटे, माधव रणदिवे, छान मुराळे, रामराव धनासुरे, गुणवंत कांबळे, प्रभु काकनाळे, ज्ञानोबा कांबळे, पत्रकार रणदिवे लक्ष्मण, दिपक रणदिवे, मोहन रणदिवे आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments