Latest News

6/recent/ticker-posts

'पोषण माह सप्ताह' भादा येथे विविध उपक्रमांनी साजरा

'पोषण माह सप्ताह' भादा येथे विविध उपक्रमांनी साजरा

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे शासनाकडून सुरू असलेल्या पोषण माह सप्ताह निमित्त मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि शासनाच्या निर्देशानुसार दि 1 ते 30 सप्टेंबर 2022 या काळामध्ये पोषण माह साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.


यामुळे पोषण माह अंतर्गत 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांनी प्रार्थना, मै बेटी हूँ बेटी नृत्य, गर्भातील मुलीची व्यथा, स्त्री भृण हत्या, मृत्यू, बेटी बचाओ बेटी पढाओ नाटीका, देश भक्तीपर गीत, स्वस्थ बालक स्पर्धा "मला मोबाईल हवा" एक पात्री नाटक अनिमिया कॅम्प सेविका मदतनिस यांचा सत्कार समारंभ घेण्यात आले.

 या कार्यक्रमासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी   गिरी यांनी उपस्थित राहून मातांना पोषणमाहचे महत्त्व पटवून दिले. तर पंचायत समिती औसा गटविकास अधिकारी सतीश पाटील यांनी आहाराचे महत्व सांगितले आणि एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी किशोर गोरे यांनी सही पोषण देश रोशन या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांसाठी आणि गरोदर माता, किशोरी मुली यांनी आहार आणि दैनंदिन दिनचर्या कशी असावी याबाबत कमी वेळेत समर्पक शब्दांत मार्गदर्शन केले. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा एम्बलवाड यांनी आरोग्याचे महात्च पटवून दिले. पोषणावर एक गीत सौ. पुष्पाताई जेटनवरे यांनी गायीले, या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. मिनाताई दरेकर, उपसरपंच बालाजी शिंदे उपस्थित  ग्रामपंचायत सदस्य भादा,बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे, विस्तार अधिकारी बालाजी तेलंग, भादा प्रा.आ. केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पवार, मुख्यध्यापक भादा नागेश पाटील, मुख्य ध्यापक भेटा मुजावर, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सुचिता कटके, श्रीमती कोदळीकर, श्रीमती कांबळे, ढेंगळे, श्रीमती कलशेट्टी, श्रीमती सुनापे, ग्राम विकास अधिकारी भादा माणिक सुर्यवंशी, आरोग्य सेवक, रवी कांबळे, जोशी सिस्टर, डॉ. वर्षा, डॉ. मस्के, शिंदे प्रमिला, गोविंद बंडे, मनोज चव्हाण, केंद्रे सुमन सर्व शिक्षक वृंद भादा  अंगणवाडी सेविका मदतनिस, गरोदर माता स्तनदा माता किशोरी मुली व बालक सह भादा, आलमला,भेटा अंतर्गत येणाऱ्या कार्य क्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आरोग्य कर्मचारी, आशा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments