Latest News

6/recent/ticker-posts

कै.रसिका महाविद्यालयात 'ब' झोन आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात

कै.रसिका महाविद्यालयात 'ब' झोन आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात


देवणी:(प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) कै.रसिका महाविद्यालय देवणी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'ब' झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा (मुले - मुली) संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. मनोज रेड्डी(माजी क्रीडा संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) डॉ. भास्कर माने ( निवड समिती अध्यक्ष 'ब' झोन  क्रॉस कंट्री संघ, मुले - मुली) डॉ. राजेश्वर पाटील ( माजी सिनेट सदस्य, स्वारातीम, विद्यापीठ, नांदेड) यांची उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दहा किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सांघिक पुरुष विजेतेपद महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर या संघाने पटकावले. तर द्वितीय क्रमांक - स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रमाबाद, तृतीय क्रमांक - ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर कोटग्या‌ळ या महाविद्यालयाने पटकावला.  पुरुष गटातून वैयक्तिक (१०किमी धावणे) सर्वप्रथम - ढगे हंसराज नाथराव, महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालय उदगीर, द्वितीय क्रमांक -  अफसनवाड नवनाथ, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर, तृतीय क्रमांक -  तारशेट्टे पांडुरंग, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट, 

महिला वैयक्तिक गटातून(१०किमी धावणे) सर्वप्रथम - खसमोडे  स्वाती अनिल,  स्वामी विवेकानंद महादेव मुक्रमाबाद द्वितीय- खसमोडे संगीता, श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर,  तृतीय क्रमांक - स्वामी अश्विनी श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सतीश मुंडे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर व डॉ. भास्कर माने यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकट बोईनवाड, (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, देवणी) डॉ. मनोज रेड्डी, डॉ. भास्कर माने, डॉ. राजेश्वर पाटील, प्रा. सतीश मुंडे, प्रा. डॉ. अनिल इंगोले, प्रा.निहाल अहमद खान, डॉ. तात्याराव केंद्रे, डॉ. दत्ता मुंडे, प्रा. डॉ. नारायण जायभाये, डॉ.दिलीप काळे, डॉ. शिवानंद पाटील, प्रा. महादेव मळभगे, रमेश सूर्यवंशी, रोहन एनाडले, विक्रम गायकवाड, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया कांबळे, स्पर्धा संयोजक प्रा.डॉ. सचिन चामले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह व पुष्पहार देऊन येथे सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे सूत्रबद्ध नियोजन व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रशांत भंडे यांनी केले. आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सचिन चामले यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी, स्पर्धक खेळाडू, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments