Latest News

6/recent/ticker-posts

म्हसे बु. येथे पाणी वापर संस्थेचे प्रशिक्षण

म्हसे बु. येथे पाणी वापर संस्थेचे प्रशिक्षण

देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) म्हसे बु. येथे आयटिसी अफार्म संस्थे मार्फेत  संगमेश्र्वर पाणी वापर संस्थाचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण दरम्यान उपस्थित शेतकर्‍यांना जलसंपदा विभाग व आयटिसी अफार्म मधील सहभागिता,उद्दिष्टे,आयटिसी व जलसंपदा विभाग यांचे कार्ये आणी जबाबदारी तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर या संबंधी माहिती देण्यात आली.यामध्ये पाणी वापर संस्थाचे भुमिका व फायदे- सभासदांचा सभामध्ये,देखभाल करण्यामध्ये तसेच प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग, शेती करिता पाण्याची मागणी तसेच पाण्याचा ताळेबंद तयार करणे, जलसंपदा विभागाला पाण्याची मागणी वेळेत करणे, पाण्याचे वाटप जलसिंचन प्रणालिची देखभाल व संचलन, पाणी पट्टी भरणे व वेळेत वसुली करणे, पाणी वापराच्या कार्यक्षम पध्दती व पिक पध्दतीची शिफारस करणे, स्थानिक वादांवर मार्ग काढणे शेतकर्‍यांच्या समुहासाठी एकञित कृती करणे, पाणी वापर संस्था चे सर्व कागदपञ आणि नोंद सांभाळणे. पाणी वापर संस्थानी पाणी मागणी अर्ज करावा. यामध्ये सभासदांकडुन पाणी वापर संस्थेस पाणी वापर संस्था सभासदांना पाण्याचा मागणीचा फाॅर्म भरायला सांगते. पाणी वापर संस्थेने सदस्यांना फाॅर्म सादर करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

सभासदांनी तो विहित फाॅर्म भरुन पाणी वापर संस्थेकडे द्यायला हवा. पाणी वापर संस्थेकडुन जलसंपदा विभागाला मिळालेल्या अर्जांचे प्रमाणीकरण, एकुण क्षेञ आणी पाण्याची आवश्यकता याचा सारांश काढणे, जलसंपदा विभागाकडे विहित नमुन्यामध्ये हि मागणी सादर करण्यासंदर्भात माहिती अमितकुमार मेहञे (समुह संघटक,अफार्म,पुणे यांनी दिली. याच बरोबर पाण्याचा ताळेबंद कसा करावा.यामध्ये कोणकोणती माहिती असावी. पाण्याचा ताळेबंद केल्यानंतर कोणकोणते फायदे होतात. यांची सखोल माहिती सागर तायडे (अभियंता,अफार्म,पुणे) यांनी दिली.

Post a Comment

0 Comments