आता भादा चौक कॅमेऱ्याच्या करड्या नजरेत कैद
बी जी शेख
औसा: तालुक्यातील ग्रामीण भागातही कॅमेऱ्याचे जाळे हळूहळू पसरत असल्याचे चित्र औसा तालुक्यातील भादा गावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे सध्या प्राथमिक स्वरूपात भादा येथील जुने गाव मुख्य चौक ग्रामपंचायत कार्यालय शेजारी या कॅमेऱ्याचे, जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुलांची आणि मुलींची या शाळेमध्येही शाळेचा माजी विद्यार्थी तथा भादेकर भूमिपुत्र अभिजीत के मजगे यांच्याकडून हे कॅमेरे गावासाठी एक पाऊल विकासाकडे म्हणून त्यांनी स्वतःहून ही गावासाठी एक अनमोल भेट देण्यात आली असल्याचे समजते. यामुळे भादा गावाचे एक पाऊल विकासाच्या,प्रगतीच्या दिशेने अशीच चर्चा सध्या भादा गावामध्ये सुरू आहे. तर या बसविलेल्या कॅमेऱ्यामुळे गावामध्ये होणाऱ्या घटना आणि दुर्घटनांची ज्या ठिकाणापर्यंत कॅमेऱ्याची नजर आहे ती अचूकपणे टिपली जाणार आहे. यामुळे गावाचा भाग आणि चौक कॅमेऱ्यात कैद झाला असून हा भाग कॅमेऱ्याच्या निगराणी खाली 24 तास राहणार असल्याने गावामध्ये होणारे अवैद्य प्रकार या कॅमेऱ्यामुळे कैद होणार काय? अशी चर्चा सध्या गावामध्ये सुरू आहे.

0 Comments