लोदगा ता. औसा येथे पोषण माह सप्ताह साजरा ग्राम विकास मंत्रालय सचिव सिन्हा यांची भेट
बी डी उबाळे
औसा: जिल्हा लातूर बाल विकास प्रकल्प औसा अंतर्गत लोदगा येथे पोषण अभियान अंतर्गत गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रमात पोषण आहार व महीला आरोग्य याबाबत ग्रामस्थांना व महिलांना जागृत करण्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले.तसेच अर्धवार्षिक वाढदिवस ,पांजीकरण, अनिमिय, सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या.
सदरील कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार सचिव नागेंद्रनाथ सिन्हा{ IAS }, जिल्हाधिकारी लातूर पृथ्वीराज बी पी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त मित्तल,आ पाशा पटेल,विभागीय उपायुक्त बेदमुता विभागीय उपायुक्त, प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी, औसा तालुक्याचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, औसा तालुक्याचे गट विकास अधिकारी सतीश पाटील, औसा तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे, आरोग्य विभागाचे मेडिकल ऑफिसर हिंदोळे, आर बी एस के टीमच्या जाधव मॅडम पर्यवेक्षिका निर्मला कांबळे मॅडम व अंगणवाडीतील सेविका मदतनीस गावातील ग्रामस्थ बचत गटाच्या महिला आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुदृढ बालक स्पर्धा,आनिमिया कॅम्प, कॅन्सर तपासणी,आर बी एस के तपासणी, आहार प्रात्यक्षिक, आरोग्याबाबत माहिती इत्यादी उपक्रम राबवण्यात आले.

0 Comments