Latest News

6/recent/ticker-posts

केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शनात संस्कार वर्धिनी हायस्कूल शिरोळ चे यश

केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शनात संस्कार वर्धिनी हायस्कूल शिरोळ चे यश


(सलीमभाई पठाण)
निलंगा: तालुक्यातील शिरोळ केंद्रांतर्गत विज्ञान प्रदर्शन निटुर ता.निलंगा येथे पार पडले. माध्यमिक गटात संस्कार वर्धिनी हायस्कुल,शिरोळ (वां) च्या विद्यार्थीनी कु.जयदेवी कज्जेवाड,नंदिनी धडे यांनी सादर केलेल्या" पर्यावरण अनुकूल सामग्री" या विषयावर सादर केलेल्या प्रयोगास द्वितीय क्रमांक मिळाला.

 तसेच प्राथमिक गटात क्षीरसागर ज्ञानेश्वरी,जाधव अंकिता या विद्यार्थिनीने सादर केलेल्या " पर्यावरण आणी हवामान बदल" या प्रयोगाला तृतीय क्रमांक मिळाला.

  विद्यार्थ्यांच्या या यशाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक डी.पी कांबळे शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले. गावकऱ्यांनी या यशाबद्दल शाळेच्या सर्व स्टाफ आणी विद्यार्थीनींचे विशेष कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments