केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला केळगाव येथे चांगला प्रतिसाद
निलंगा: तालुक्यातील काटेजवळगा केंद्राचे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन जि.प.प्रा.शाळा-केळगाव येथे संपन्न झाले.यावेळी प्राथमिक गटातून के.प्रा.शा.काटेजवगा,प्रा.शा.जाजनुर,प्रा.शा.कलांडी,प्रा.शा.केळगाव,प्रा.शा.झरी,प्रा.शा.खडकउमरगा,प्रा.शा.बुजरुगवाडी,बहामबीर ऊर्दु शाळा केळगाव,शिवाजी आश्रमशाळा(प्रा.) राजर्षी शाहु महाराज प्रा.वि.काटेजवळगा तर माध्यमिक गटातून शिवाजी आश्रम शाळा (मा.) केळगाव या शाळाने सहभाग नोंदवला, एकुण ११ शाळेंनी प्रयोगाचे सादरीकरण केले व केंद्रातील खाजगी शाळासह जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली,प्रयोगाचे निरिक्षण केले.
सकाळच्या सत्रात काटेजवळगा केंद्राचे केंद्रिय मु.अ.गिरी सुंदरगीर, केळगाव शाळेचे शाळा व्यव.समिती अध्यक्ष चव्हाण धोंडिराम, उपसरपंच चव्हाण सुधाकर, केळगाव तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कांबळे,जि.प.प्रा.शाळा केळगाव चे मु.अ.संतोष भंडारे यांच्या हस्ते मिसाईल मॅन APJ Abdul Kalam यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चांबारगे विठ्ठल यांनी केले. गोविंद मुरमे व त्यांच्या विद्यार्थी चमूने स्वागत गीत सादर केले,सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यानंतर इ. ३री -इ. ५वी मधील निवडक विद्यार्थीनींनी 'विज्ञानाची परी ग बाई मी विज्ञानाची परी' या गीताचे सादरीकरण सय्यद नसिमबानु यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.
जि.प.प्रा.शा.केळगाव शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी प्रयोगाचे परिक्षक म्हणुन राठोड बी.आर.(मा.शिक्षक)व चव्हाण व्ही.व्ही.(मा.शिक्षक) यांनी प्रयोगाचे परिक्षण केले तसेच गटसाधन केंद्र निलंगा मार्फत तालुका निरिक्षक म्हणून गुणाजी सुर्यवंशी यांनी प्रयोगाची पाहाणी केली. यात प्रथम क्रमांक जि.प.प्रा.शाळा-झरी (बहुउपयोगी इंधन चूल) द्वितीय क्रमांक जि.प.प्रा.शाळा-केळगाव(पर्यावरण व हवामान बदल) तृतीय क्रमांक शिवाजी आश्रम शाळा- केळगांव(आरोग्य व स्वच्छता) निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवून गिरी यांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक व मान्यवराचे आभार गोंदगे किरण यांनी मानले.



0 Comments