गोगलगाय नुकसान जाहीर केले 52 कोटी अन् 43 कोटी रुपयांच्या भरपाईचे धनादेश बँकांना प्रदान
बी डी उबाळे
औसा: यापूर्वी शासनाकडून औसा तालुक्यातील पाच मंडळासाठी 52 कोटी रुपये गोगलगाय अनुदान मंजूर केले होते परंतु प्रत्यक्षात हे अनुदान आता कमी करून 43 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मिळत आहे. गुरुवार दि 6 ऑक्टोंबर 2022 रोजी तहसील कार्यालय, औसा येथे झालेल्या कार्यक्रमात गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी द्यावयाच्या 43 कोटी 7 लक्ष रुपयांचे धनादेश 6 बँकांच्या प्रतिनिधींना गुरुवार दि 6 ऑक्टोंबर 2022 रोजी प्रशासकीय इमारत औसा येथे वितरित केले.
तालुक्यातील सुमारे 43 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पुढील आठवड्यात प्रत्यक्षात जमा होईल. सगळ्या आस्मानी संकटांमधून जे काही थोडे बहुत सोयाबीन वाचले आहे ते काढणीला आले असून नुकसाभरपाई मिळाल्यावर शेतकऱ्यांना काढणीच्या खर्चाला हातभार नक्कीच लागेल.
औसा तालुक्यात सर्वात जास्त रक्कम भादा गावाला मिळाली आहे,अशी प्राथमिक माहिती मिळाली, यात सर्वात महत्त्वाचा वाटा शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती तात्काळ शेतकरी ते आमदार यांच्यापर्यंत दिली आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यात तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक इत्यादींचे आहे. तसेच सर्व वृत्तपत्राचे पत्रकार ऑनलाईन/ऑफलाइन यांचेही खूप सहकार्य झाले,असे दिसून येत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त केले जात आहेत तसेच शेतकरी कष्टकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन तालुक्यात केले जात आहे.
वीज पडून औसा तालुक्यातील मृत्युमुखी पडलेल्या 5 पशू पालकांना नवीन खरेदीसाठी सानुग्रह अनुदानाचे धनादेशही यावेळी वितरित केले.संततधार पाऊस नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच सरकारकडून उपलब्ध होणार असून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभे राहील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.



0 Comments