औसा तालुक्यात शेतकऱ्यांचा कोथिंबीर उत्पादनाकडे कल; नगदी आणि कमी कालावधीचे पीक
बी डी उबाळे
औसा: सध्या निसर्गाच्या विविध समस्या आणि कृपेमुळे शेतकरी कमी कालावधीचे पीक म्हणून कोथिंबीर उत्पादनाकडे वळत असून यामुळे केवळ एक महिन्यांमध्ये हे पीक हातात येते यामुळे हे नगदी पीक समजले जाऊन अनेक शेतकरी या कोथिंबीर उत्पादनाकडे वळल्याचे चित्र औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये दिसून येत आहे.
निसर्गाचे दुष्टचक्र सतत शेतकऱ्याच्या सभोवताली असून यामुळे सुरुवातीला पाऊस न पडणे नंतर पाऊस सतत पडणे त्यानंतर अतिवृष्टी होणे आणि नंतर एकदम पाऊस बंद पडणे यामुळे लातूर जिल्ह्यातील आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख खरीप पीक असलेले सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आणि पेरणीचा खर्च सोडाच आहे ते उत्पन्नही हातचे गेले त्यामुळे विविध समस्यांनी ग्रासलेले औसा तालुक्यातील शेतकरी यांनी कोथिंबीर उत्पादनाकडे भर दिल्याचे चित्र औसा तालुक्यात दिसून येत आहे.


0 Comments