भादा येथील नाट्य कलाकार झाले अधिकृत नोंदणी कलाकार
बी.डी.उबाळे
औसा: औसा तालुक्यातील भादा ता औसा येथील नाट्य कलाकार झाले नोंदणी कृत आणि शासकीय सर्वमान्य कलाकार अशी चर्चा सुरू आहे. औसा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेले नाटक आणि नाट्य कलाकार हे आतापर्यंत नोंदणी कृत नव्हते परंतु नुकतेच भादा येथील नाट्य कलाकार आणि मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली भादा तालुका औसा येथील सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेने कलारसीक सेवाभावी संस्था र न F- 26759(LTR)भादा तालुका औसा जिल्हा लातूर या नावाने नोंदणी केली असून या नोंदणीचे प्रमाणपत्र भादा तालुका औसा येथील नाट्य कलाकार बाबू नंदू आगलावे यांना प्राप्त झाले आहे.
यामुळे आतापर्यंत होणारे नाटक हे आता अधिकृतपणे नाटक कलाकार होणार आहेत. भादा तालुका औसा येथील सेवाभावी संस्था कलारसिक नाट्य मंडळ भादा अंतर्गत कला रसिक नाट्य मंडळ या नावाने या नाट्य कलाकारांची नोंदणी शासकीय स्तरावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नियमानुसार करण्यात आले असून त्याचे प्रमाणपत्र ही मिळाले आहे. यामुळे या नाट्यकलाकारांची नोंदणी करत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी भादा येथील नाट्य कलाकार बी एन शिवलकर आणि बी एन आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली एक नाट्य कलाकार समिती तयार करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष बाबू आगलावे,सचिव महादेव गायकवाड, उपाध्यक्ष लक्ष्मण उबाळे,युनूस पठाण,श्रीपाद शिंदे,नवनाथ शिंदे, महादेव शिंदे, विठ्ठल देवरे, बाबुराव शिवलकर यांच्यासह भारत अंधारे,विजय शिंदे यांचा समावेश आहे. या नोंदणी नंतर प्रथमच या नाट्य कलाकारांचा प्रयोग पुण्यामध्ये "रक्तात रंगले सौभाग्य "आयोजित करण्यात आला होता.


0 Comments