धम्मक्रांती शिबिर माजलगाव येथे संपन्न
बी डी उबाळे
माजलगाव: त्रिरत्न बौद्ध महासंघ माजलगाव च्या वतीने धम्मक्रांती शिबिराचे आयोजन दिनांक 22 ते 26 ऑक्टोबर 2022 या पाच दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन गुरुमाऊली फार्मसी इन्स्टिट्यूट माली पारगाव या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी मैत्रेयनाथ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आणि आपण असा शिबिराचा विषय होता.
माजलगाव शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या माली पारगाव शिवारात गुरुमाऊली फार्मसी इन्स्टिट्यूटच्या नयनरम्य परिसरात शिबिर घेण्यात आले.
दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 8:00वाजता माऊली इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष डॉ यशवंत राजे भोसले यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली. याप्रसंगी धम्मचारी मैत्रेयनाथ यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये शिबिराची संकल्पना स्पष्ट केली. दिनांक 23 ऑक्टोबर 2022 पासून सकाळी 7:00 वाजता अनापान सती ध्यान सराव
10:00 वाजता मुख्य प्रवचन, गटचर्चा, संपर्क सराव, मेत्ता भावना ध्यान सराव सायंकाळी प्रवच व पूजा असे भरगच् कार्यक्रम घेण्यात आले.
धम्मचारी मैत्रेयनाथ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म पूर्वीची सामाजिक व धार्मिक स्थिती, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बालमनावर झालेले जातीयतेचे आघात त्यातून त्यांनी मिळवलेले उच्च शिक्षण, सामाजिक सुधारनासाठी उभारलेले लढे, गोलमेज परिषदेतील प्रखर राष्ट्रभक्ती, ब्रिटिश कौन्सिल मध्ये नवनिर्मितीसाठी दिलेले योगदान, वेगवेगळ्या परियोजना,धर्मांतराची घोषणा, पुणे करार, संविधानाची निर्मिती, बौद्ध धम्माचा शोध आणि बौद्ध धम्माची दीक्षा अशाप्रकारे बाबासाहेबांनी उभारलेली धम्मक्रांति आपल्या प्रवचनामधून अतिशय सुस्पष्टपणे मांडली. मैत्रेयनाथ यांच्या सदाबहार अभ्यासपूर्ण शैलीने जणूकाही चलचित्र डोळ्यासमोरून फिरत होती, असे चित्र उभे केले.
या शिबिरात शील या विषयावर धम्मचारी ज्ञानसंभव, समाधी या विषयावर धम्मचारी सामसिद्धी आणि प्रज्ञा या विषयावर धम्मचारीनी जयप्रिया यांनी यथोचित असे अभ्यासपूर्ण प्रवचन दिले. शेवटच्या दिवशी 26ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात धम्म सहाय्यक दीपक भालेराव यांना धम्मचारी मैत्रेयनाथ यांच्या हस्ते धम्ममित्राची दीक्षा देण्यात आली. शिबिरार्थींचे भाव विभोर मनोगत शिबिर यशस्वी झाल्याचे द्योतक होते. शिबिरात धम्मचारी सत्यदीप, कल्याणबंधू, जयप्रिया, शांतिकीर्ती, सामसिद्धी, ज्ञानसंभव, करूणादित्य, अमितरूची, ज्ञानवज्र, विरतकुमार आणि अमोलरत्न असे एकूण बारा धम्मचारी आणि धम्मचारिनी मार्गदर्शनास उपस्थित होते. 65 शिबिरार्थी 12 धम्मचारी असे एकूण 77 संख्या होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र रणदिवे बि जी, शिनगारे एन जी, ढाकरगे भीमराव,लक्ष्मण सहजराव, पोटभरे लक्ष्मण, अरुण नाकलगावकर, भालेराव सदाशिव, जालिंदर देशमाने, दीपक भालेराव, ग्रीनतारा महिला चाप्टर, धम्मसहायक जी एन घनघाव, निवृत्ती शिंदे यांनी परिश्रम घेतले. शेवटी मैत्री गीताने शिबिराची सांगता झाली.



0 Comments