औशात रस्ता अरुंद आणि वाहनांची गर्दी यामुळे होतोय सतत चक्का जाम
बी डी उबाळे
औसा: शहरातील हाश्मी चौक टी पॉइंट येथे रस्ता अरुंद असल्याने सतत वाहनांची गर्दी होऊन या चौकात सतत चक्का जाम झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. यामध्येच पुन्हा खाजगी वाहने वेडीवाकडी पार्क केल्यामुळे या ठिकाणी सतत चक्काजाम होत असल्याने वाहनांची गर्दी एकेक किमी अंतरापर्यंत शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोंबर 2022रोजी रात्री 6,:30 ते 8:00 वाजे पर्यंत वाहने उभी राहिली असल्याचे दिसून आले आहे.
यापुर्वी या ठिकाणी होणाऱ्या चक्काजामच्या बातम्या सतत विविध प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी केल्यामुळे येथील चौकात असलेले सर्व फळ आणि भाजी विक्रेत्यांना व दुकानदारांना नोटीसा देऊन ते मागे घेण्याचा आदेश दिला होता.त्यामुळे येथील चौकाने मोकळा श्वास घेतला होता. पण दुकाने फेरीवाले मागे हटले परंतु खाजगी वाहनामुळे परत दिवाळीनिमित्त या चौकात चक्काजाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी स्वतंत्र पोलीस बल वाढवून बंदोबस्त देऊन देखील येथील खाजगी वाहनधारक नियम धाब्यावर बसवून वाहने आडवी लावून प्रवासी वाहतूक करत असल्याचे दिसत आहे.
ज्याप्रमाणे पथविक्रेत्यांना व दुकानदारांना नोटिसा दिल्या त्याप्रमाणे खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालक यांना तशाच प्रकारची नोटीस देऊन आपली वाहने व्यवस्थित करावी अशा प्रकारच्या सूचना देणे आवश्यक आहे. जे वाहन चालक नियमाचे पालन करणार नाहीत अशा वाहनांवर नियमाने कार्यवाही करण्याची सक्ती करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेला पुर्णपणे साफसफाई करून वाहतुकीसाठी व्यवस्थित करणे आवश्यक आहे.रस्त्याच्या कडेला दगड माती व चिखल झाल्याने दाटीवाटीने वाहने चालतात ही रहदारी कमी करण्यासाठी मोकळ्या झालेल्या जागेवर साफसफाई करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने पूर्वीप्रमाणे ॲक्शन मोड मध्ये येऊन कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे येथील नागरीकांचे म्हणणे आहे. अन्यथा हा चक्काजाम सतत होत राहील आणि नागरिकाची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था पोलिस प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



0 Comments