पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात
पुणे:(प्रतिनिधी/मुस्तफा सय्यद) हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए-मिलादुन्नबी पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
नूर-ए-ईमान -कुंजूल मदरसा तर्फे भव्य जुलूस आयोजित करण्यात आला. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा संदेश याचं सध्या आचरण होणं गरजेचं आहे.समता,बंधुता,मानवता याचं उत्तम उदाहरण या जुलुसमध्ये दिसलं.
स्थानिक नगरसेवक,पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फुर्त भाग घेऊन हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला.
विविधतेतुन एकतेचे दर्शन या कार्यक्रमातुन दिसले.

0 Comments