केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या विधानाच्या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन सेनेचा निषेध मोर्चा
ठाणे: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 4 ऑक्टोबर रोजी नागपूर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने मंगळवारी निषेध नोंदवण्यात आला. सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध धरणे आंदोलन करण्याचे आदेश दिल्याने ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2:00 वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रामदास आठवले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष खाजामिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. आनंद नवसागरे, बाळु ओव्हाळ, दिपाताई बम, अरूण शिरसाठ, प्रकाश वानखेडे, उमेश खंडारे, शिर्के, मनोहर वाघमारे, नूरजहाँ शेख, कल्याण डोंबिवली, उल्ल्हास नगर, बदलापूर, अंबरनाथ, मिरा बहिंदर, नवी मुंबईतील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments