तहसीलदार,गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तीन दिवसीय ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षणाची सांगता
बी डी उबाळे
औसा: पंचायत समिती येथे गेल्या तीन दिवसापासून ग्राम रोजगार सेवक यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले .याची सांगता दि 12 ऑक्टोबर 2022 रोजी झाली. यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी आणि गटविकास अधिकारी सतीश पाटील उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सूर्यवंशी आणि गटविकास अधिकारी पाटील यांनी ग्रामरोजगार सेवकांना मार्गदर्शन करताना औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते ती पारदर्शक पद्धतीने करा आणि यामध्ये शक्यतो चुका होऊ देऊ नका अशा सूचना ग्रामरोजगार सेवकांना केल्या आणि ही योजना प्रभावीपणे राबवून सर्वांगीण विकास करून घ्यावा असे ही त्यांनी यावेळी सूचित केले.
औसा तालुक्यामध्ये समृद्धी बजेट निर्माण करण्यासाठी ज्या तांत्रिक बाबींची ग्राम स्तरावर आवश्यकता असते याबाबत फेरी आणि प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी वाघोली गावात भेट देऊन त्या ठिकाणी गाव फेरी आणि शिवार फेरी काढण्यात आली आणि काम निवडीबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.आणि ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी प्रथम वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्याने कुटुंब यांची आर्थिक परिस्थिती सुधारणा होते आणि कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर गाव सुद्धा सुधारणा होते यामुळे पर्यायाने आपला महाराष्ट्र हा आर्थिक बाबतीत सक्षम होतो हे सर्व योग्यरित्या होण्याकरिता औसा तालुका पंचायत समिती येथे दिनांक 10 ते 12 ऑक्टोबर 2022 रोजी हे तालुकास्तरावर 3 दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून ज्योतीबा डुकरे ,निलेश राठोर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हिंगोली व अखिलेश कुरील राज्य प्रशिक्षक हे प्रशिक्षक म्हणून यांनी खेळीमेळीच्या वातावरणात अगदी सहजतेने सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले.या 3 दिवसीय प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र उपस्थित सर्वांना वितरित करण्यात आले.
यावेळी औशाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत बारबोले,मनीषा बनसोडे, बुलबुले आणि तांत्रिक अधिकारी नितीन चव्हाण, डोकडे,मोरे,ढेकणे आणि लिपीक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरी, पवार, राठोड, आदी उपस्थित होते.



0 Comments