देवणी नगरपंचायतींने पत्रकार परिषदेत दिली केलेल्या सहा महिन्यातील विकास कामाची माहिती
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) देवणी नगरपंचायतीच्या वतीने शहरात गेल्या सहा महिन्यात केलेल्या विकास कामाची माहिती बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षा डॉ किर्ती घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जून मानकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवणी नगरपंचायत निवडणूकनंतर गेल्या सहा महिन्यात देवर्जनच्या पुलाचे काम,विष्णु मंदिरासाठी आलेल्या आठरा लाखाचे काम,एस. टी.पी.चे अठरा लाखाचे काम,दगडुदान टेंडर साठी अडूसष्ट लाखाचे टेंडर ला मंजुरी,दलित वस्तीसाठी एक कोटी सत्तर लाखाची प्रशासकीय पद्धतीने मंजुरी ,रमाई आवास योजनेची पंचावन्न घरांची मंजुरी,प्रधानमंत्री आवास योजना तीन कोटी चौतीस लाखाची मंजुरी व तसेच शहरातील विविध भागात केलेल्या विकास कामे संदर्भात सखोल अशी माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते
मलिकार्जून मानकरी यांनी यावेळी बोलताना दिली. तर विविध विषयांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता नगराध्यक्षा डॉ किर्ती घोरपडे, नगरसेवक प्रा,डॉ अनिल इंगोले आणि जेष्ठ नेते मलिकार्जून मानकरी यांनी समाधानकारक चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष अमित मानकरी वैजनाथ लुल्ले, डॉ. संजय घोरपडे, नगरसेवक प्रवीण बेळे, जावेद मिर्झा, विद्यासागर, प्रशांत घोलपे,अमरदीप बोरे, जावेद तांबोळी, नदीम मिर्झा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments