"सीता माते पेक्षा आधीक वनवास माझ्या नशिबी आला" घरासाठी रुकसाना यांची आर्त हाक
शेख बी जी.
औसा: तालुक्यातील मौजे भादा येथील रहिवासी रुकसाना युसुफ मुलानी यांचा वनवास सीतामातेपेक्षाही अधिक झाला असल्याची भावना त्यांनी आपल्या शब्दात व्यक्त केली."लग्नापासूनच हा वनवास मला भोगावा लागत आहे. लग्न झाल्यानंतर पतीने काही दिवसातच दुसरा विवाहा थाटला. त्यांच्याशी ज्या वेळेला पटेना त्या वेळेला पतिच्या परवानगीने स्वतंत्र राहण्याचे ठरवले. पाच ते सहा वर्ष शिवविच्छेदन करणाऱ्या ठिकाणाच्या बाजूला ईदगाह मैदानावर पत्र्याचे शेड करून राहिले. स्वतःची जागा नसल्याने तुम्हाला घरकुल मिळणार नाही असे ग्रामपंचायत कार्यालयाने सांगितले. स्वतःची जागा नसल्याने मी अर्ज देखील करू शकले नाही. म्हणून तीस ते पस्तीस वर्ष इकडून तिकडे भटकंती केली. कधी मुलाकडे तर कधी मुलीकडे राहिले. मुलाने नेहमी मला औसा येथे स्वतः जवळ राहण्याची सतत विनवणी केली. मात्र माझे मन गावातच लागत असल्याने मुलाजवळ राहिले नाही. माझ्या मुलाने कसेबसे स्वतःची जागा घेतली आहे. तरीही ग्रामपंचायत कार्यालय मला घरकुलापासून वंचित ठेवले आहे." अशा प्रकारच्या भावना रुकसाना यांनी मराठी अस्मितेचा इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.
गावात विद्यमान परिस्थितीत पाचशे पेक्षा अधिक लोकांचे घरकुल मंजूर असल्याचे येथील ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यापैकी 54 घरकुलांचे बांधकाम सद्यस्थितीमध्ये चालू आहे. यात या महिलेचे नाव नाही. याचे कारण विचारले असता त्यांची स्वतःच्या नावे जागा नसल्याचे कारण येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. घरकुलांचे वाटप केले गेले मात्र गरजू व गरीब कुटुंबातील व्यक्तींना घरकुलापासून वंचित ठेवले गेले आहे. मुलीच्या लग्नानंतर या महिला गावात मुलाने घेतलेल्या जागेवर शेडमध्ये एकटेच राहतात. गावाच्या कडेला असल्याने या पत्र्याच्या शेडमध्ये जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. म्हणून येथील ग्रामपंचायत कार्यालयाने विशेष बाब म्हणून पाहणे गरजेचे आहे व तसा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून तात्काळ घरकुल मंजूर करून या महिलेची सोय करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.


0 Comments